लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्व मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रूळ, अव्हेर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील जलद लोकल फेऱ्या धिम्या मार्गावर वळवण्यात येणार व हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.२० ते दुपारी ३.४५ या वेळेत ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गांवर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत ब्लॉक आहे. परिणामी सीएसएमटी-पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यान सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी / नेरूळमार्गे प्रवास करण्याची परवानगी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत देण्यात आली आहे.
पत्री पुलासाठी विशेष ब्लॉककल्याण ते ठाकुर्लीदरम्यान तिसऱ्या पत्री पुलाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्याचे गर्डर उभारण्यासाठी ६ ते ९ मार्चदरम्यान काम करण्यात येणार असून यासाठी मध्य रेल्वेने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल केला असून काही लोकल फेऱ्या अंशतः रद्द राहणार आहेत. ७-८ मार्च : कल्याण ते डोंबिवलीअप-डाउन जलद-धीमी, पाचवी-सहावी मार्गिकावेळ: शनिवारी मध्यरात्री १:४५ ते पहाटे ४:१५परिणाम : ब्लॉक कालावधीत कल्याण ते डोंबिवलीदरम्यान अप-डाउन जलद व धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहतील. सीएसएमटीहून कर्जतसाठी मध्यरात्रीनंतर १२.०८ वाजता सुटणारी लोकल ठाणेपर्यंतच धावेल.
Web Summary : Central and Harbour lines face megablocks for maintenance. Some local trains will be diverted or cancelled. A special block for Patri bridge work will also affect services.
Web Summary : रखरखाव के कारण मध्य और हार्बर लाइनों पर मेगाब्लॉक रहेगा। कुछ लोकल ट्रेनें परिवर्तित या रद्द रहेंगी। पत्री पुल के काम के चलते भी सेवाएं प्रभावित रहेंगी।