हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:07 IST2021-05-08T04:07:23+5:302021-05-08T04:07:23+5:30

मध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देखभाल कामांसाठी हार्बर रेल्वेमार्गावर रविवार ९ मे राेजी ...

Megablock tomorrow on the Harbor railway line | हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देखभाल कामांसाठी हार्बर रेल्वेमार्गावर रविवार ९ मे राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नसेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर लाईन मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान, चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / वडाळा रोड येथून डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून डाउन हार्बर मार्गावरील सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगावकरिता सुटणाऱ्या उपनगरी सेवा रद्द राहतील.

अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता सुटणाऱ्या आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरिता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा चालविल्या जाणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत त्याच तिकीट किंवा पासवर मध्य रेल्वेमार्गे आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे.

दरम्यान, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस-कल्याण विभागात मध्य रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मध्यरात्री १२.३० ते ४.३० बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यामुळे दिवसकालीन मेगाब्लॉक नसणार आहे.

..........................................

Web Title: Megablock tomorrow on the Harbor railway line