Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 01:43 IST

नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

मुंबई : विविध दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - मुलुंड अप व डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.३० ते संध्याकाळी ४.३० दरम्यान मेगाब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी ११.२२ ते सायंकाळी ४.१७ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंड ते दादरदरम्यान सर्व स्थानकांवर थांबून परळ येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गांवर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटी / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या व सीएसएमटीहून सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे / गोरेगावकरिता सुटणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :लोकलमध्य रेल्वे