Join us  

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 1:20 AM

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक आहे. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकावर जलद मार्गावरील स्थानकाअभावी लोकल थांबा नसेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी रात्रकालीन ब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येतील.

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ पर्यंत माटुंग्याहून कल्याण दिशेकडे जाणारी लोकल मुलुंडपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. जलद मार्गावर अतिरक्ति स्थानकांअभावी ब्लॉकवेळेत या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.

वडाळा रोड ते वाशी दोन्ही दिशेकडील लोकल सकाळी ११.१० ते ३.४० वाजेपर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी १०.१७ ते दुपारी ३ पर्यंत पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाºया लोकल रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल धावतील.पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, २-३ नोव्हेंबर रोजी रात्रीकालीन ब्लॉक असेल. रात्री १२.३५ ते पहाटे ३.३५ पर्यंत वसई रोड फलाट क्रमांक ७ वर साडे तीन तासांचा ब्लॉक असेल. याच दिवशी रात्री १२.४५ ते पहाटे ४.१५पर्यंत वसई रोड फलाट क्रमांक ६ वर ब्लॉक असेल. यावेळी रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करण्यात येईल.हार्बर, पश्चिम मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉकमाहिम स्थानकादरम्यान पादचारी पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे. यासाठी हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर मध्यरात्री १२.३० ते ४.३० या दरम्यान हार्बरवर ब्लॉक घेण्यात येईल, तर रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत पश्चिम रेल्वेच्या जलद आणि धिम्या मार्गावर दोन्ही दिशेकडे जाणाºया मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.२ नोव्हेंबरला रात्री १२.३१ वाजता चर्चगेटहून भार्इंदरसाठी सुटणारी शेवटची लोकल असेल, तर बोरीवलीहून चर्चगेटसाठी सुटणारी शेवटची लोकल १२.१४ची असेल. रात्री १२.३१ ची चर्चगेट ते अंधेरी, रात्री १२.३८ चर्चगेट ते बोरीवली, रात्री १२.३६ वाजताची सीएसएमटी ते वांद्रे लोकल रद्द होईल. रात्री ८.०१ वाजताची अंधेरी ते चर्चगेट, रात्री ९.४४ वाजताची बोरीवली ते चर्चगेट, रात्री १२.२८ वाजताची अंधेरी ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येईल.

 

 

टॅग्स :रेल्वेलोकल