Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:13 AM

राम मंदिर येथे लोकलला थांबा नाही; हार्बरवर धावणार विशेष लोकल

मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा व इतर पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे राम मंदिर स्थानकावर अतिरिक्त फलाटाअभावी लोकलला थांबा नसेल.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे स्थानकापर्यंत धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या लोकल कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तर सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे सुटणाºया जलद लोकल संबंधित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबा घेतील.हार्बर मार्गावर सीएसएमटी / वडाळा रोडहून वाशी / बेलापूर / पनवेलकडे सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत सीएसएमटीहून चुनाभट्टी / वांद्रेकडे जाणाºया, सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत चुनाभट्टी / वांद्रेहून सीएसएमटीकडे जाणाºया तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ पर्यंत सीएसएमटीहून वांद्रे / गोरेगावकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.ब्लॉक काळात रविवारी सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत वांद्रे / गोरेगावहून सीएसएमटीकडे जाणाºया लोकल रद्द करण्यात येतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. त्या कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून रवाना होतील.हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याच तिकीट किंवा पासावर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.विलेपार्ले स्थानकावर लोकलला दोनदा थांबापश्चिम रेल्वे मार्गावरील सांताकु्रझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असेल. रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. विलेपार्ले स्थानकावर फलाट क्रमांक ५/६ ची लांबी कमी असल्याने येथे लोकलला दोनदा थांबा दिला जाईल. तर, राम मंदिर स्थानकावर अतिरिक्त फलाट नसल्याने या स्थानकावर ब्लॉकदरम्यान एकही लोकल थांबणार नाही.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटरेल्वेलोकलमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे