मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार ते ठाणे दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी २.३० दरम्यान कल्याणकडील जलद मार्गावरील विशेष फेऱ्या माटुंगा ते दिवा दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. दिवा येथून सकाळी ९.५८ ते दुपारी ३.१८ दरम्यान सीएसएमटीकडे जाणाºया जलद विशेष फेºया दिवा, माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावरून धावतील.हार्बर मार्गावर सकाळी ११.२५ ते दुपारी ४.२५ पर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत अत्यावश्यक प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लोकल पनवेल-कुर्ला-पनवेल या दरम्यान धावतील.
मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:16 IST