Join us
Daily Top 2Weekly Top 5

Megablock News: उद्या वेळापत्रक पाहून प्रवास करा; मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 09:11 IST

सकाळी ११.०५ ते सायंकाळी ३.०५ पर्यंत वेळेत बदल

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, सकाळी ११.०५ ते सायंकाळी  ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०२.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. सकाळी ११.०५ ते सायंकाळी  ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बरवर ब्लॉक आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत  येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे अप आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द आहेत.

डाउन जलद मार्ग-

१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.

२) ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून दुपारी ३.०३ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्ग-

१) ब्लॉकपूर्वी सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.१७ वाजता सुटेल. ११.३६ वाजता पोहोचेल.

२) ब्लॉकनंतर सीएसएमटीसाठी पहिली लोकल पनवेल येथून ४.१० वाजता सुटेल. ५.३० वाजता पोहोचेल.

डाउन ट्रान्स-हार्बर मार्ग-

१) ब्लॉकपूर्वी पनवेल येथे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल. पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल.

२) ब्लॉकनंतर पनवेल येथे जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४ वाजता सुटेल. पनवेल येथे दुपारी ४.५२ वाजता पोहोचेल.

अप ट्रान्स-हार्बर मार्ग-

१) ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल. ठाणे येथे ११.३३ वाजता पोहोचेल.

२) ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल. ठाणे येथे सायंकाळी ५.२० वाजता पोहोचेल.

बोरिवली ते भाईंदरदरम्यान आज ‘ब्लॉक’-

पश्चिम रेल्वेकडून विविध कामांसाठी शनिवारी (दि.२७ जुलै) मध्यरात्री १२:०० ते २८ जुलै पहाटे ४:३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर बोरिवली ते भाईंदर दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप धिम्या मार्गावरील सर्व ट्रेन विरार, वसई रोड ते बोरिवली, गोरेगावदरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच विरारकडे डाउन मार्गावरील धिम्या मार्गावरील ट्रेन गोरेगाव ते वसई रोड, विरार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

टॅग्स :मुंबईलोकल