‘मेगा कॉम्पिटिशन आॅफ महाराष्ट्र’

By Admin | Updated: May 19, 2015 00:37 IST2015-05-19T00:37:15+5:302015-05-19T00:37:15+5:30

‘मेगा कॉम्पिटिशन आॅफ महाराष्ट्र’ या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ए. आर. क्रिएशन्स आणि सीएफएस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

'Mega Competition of Maharashtra' | ‘मेगा कॉम्पिटिशन आॅफ महाराष्ट्र’

‘मेगा कॉम्पिटिशन आॅफ महाराष्ट्र’

नवी मुंबई : ‘मेगा कॉम्पिटिशन आॅफ महाराष्ट्र’ या जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ए. आर. क्रिएशन्स आणि सीएफएस यांच्या वतीने करण्यात आले आहे. गायन, नृत्य, शॉर्ट फिल्म्सच्या स्पर्धा होणार आहेत. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धां होईल.
स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली जाणार आहे. विजेत्या स्पर्धकांना १ कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. निवडक स्पर्धकांना ए. आर. क्रिएशन्सच्या चित्रपटात
काम करण्याची संधी दिली जाणार आहे. ए. आर. क्रिएशन्सच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना आर्थिक साहाय्य केले जाईल.
१० जूनपर्यंत स्पर्धकांना अर्ज करता येईल. लवकरच सिटी क्लब या संकल्पनेच्या माध्यमातून कलाकार आणि प्रेक्षकांना जोडणारे व्यासपीठ उभारले जाणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी
सहभागी व्हावे, असे आवाहन ए.आर. क्रिएशन्सचे संचालक पी.डी. राठोड आणि सिटी
क्लबचे डायरेक्टर पल्लवी वळे
यांनी केले. इच्छुक कलाकारांनी
६६६.ेीँूङ्मेस्री३्र३्रङ्मल्ल२.ूङ्मे या संकेतस्थळाला
भेट देऊन प्रवेश अर्ज भरावेत,
असे आवाहन करण्यात आले
आहे. याशिवाय ०८०४५३८३८३८ या क्रमांकावरही आपले नाव नोंदवता येईल. (प्रतिनिधी)

च्कलाकार आणि प्रेक्षकांना जोडणारे व्यासपीठ उभारले जाणार.
च्जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन.

Web Title: 'Mega Competition of Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.