मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; पनवेल-कुर्ला विशेष लोकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 06:19 IST2018-03-04T02:36:08+5:302018-03-04T06:19:27+5:30

अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

Mega Blocks on the three railway lines today in Mumbai | मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; पनवेल-कुर्ला विशेष लोकल

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; पनवेल-कुर्ला विशेष लोकल

मुंबई : अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेमार्गावर सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते ४.४० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी १०.४७ ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मुलुंडहून सुटणाºया डाऊन जलद लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येतील. दरम्यान या लोकल ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि शेवटच्या स्थानकावर १० मिनिटे उशिराने पोहोचतील. डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्टेशनांवर लोकल थांबणार नाहीत. या स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांहून प्रवास करण्याची मुभा आहे. सकाळी १०.३७ ते दुपाारी ३.०६ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणा-या अप जलद लोकल निर्धारित थांब्यांशिवाय दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वेमार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप, डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून या काळात दोन्ही दिशेच्या लोकल सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. त्या धिम्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.

पनवेल-कुर्ला विशेष लोकल
हार्बर मार्गावर सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोडहून सुटणाºया आणि वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाºया सर्व लोकल आणि सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाºया आणि वांद्रे/अंधेरीला जाणाºया सर्व लोकल बंद राहतील. सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडला जाणाºया आणि सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.०९ वाजेपर्यंत अंधरी/वांद्रे येथून सीएसएमटीला जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८वरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील.

Web Title: Mega Blocks on the three railway lines today in Mumbai