म.रे.वर आज मेगाब्लॉक

By Admin | Updated: March 15, 2015 00:10 IST2015-03-15T00:10:02+5:302015-03-15T00:10:02+5:30

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मानखुर्द-कुर्ला मार्गावरील दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mega Blocks on Monday | म.रे.वर आज मेगाब्लॉक

म.रे.वर आज मेगाब्लॉक

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मानखुर्द-कुर्ला मार्गावरील दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. १०.३० ते दु. ३ आणि स. ११ ते दु. ३ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या कालावधीतील ब्लॉकच्या मार्गावरील गाड्या डाऊन धिम्या मार्गावरून सोडण्यात येतील. त्यामुळे या कालावधीत जलदच्या ठाणेसह डोंबिवली स्थानकांत गाड्या नसतील, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.
हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर ब्लॉक असल्याने या कालावधीत वाशी/पनवेल/बेलापूर येथून सीएसटीला तसेच सीएसटीहून त्या ठिकाणी होणारी वाहतूक रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-कुर्ला आणि पनवेल- मानखुर्द मार्गांवर विशेष लोकल सोडणार असल्याचे जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे़ त्याच तिकीट/पासावर प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स-हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
कुर्ला पूर्वेतून वाशीसाठी धावणार बेस्टची सुविधा : रेल्वे प्रवाशांची गैरसोय होईल, हे लक्षात घेत बेस्टच्या वतीने ५०१ क्रमांकाची बस कुर्ला पूर्वेतून वाशीसाठी ठरावीक वेळाने सोडण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत ही पर्यायी सुविधा प्रवाशांना मिळणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही सुविधा हार्बरच्या
ब्लॉकच्या कालावधीत उपलब्ध असेल, असेही स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

च्कुर्ला पूर्वेतून वाशीसाठी धावणार बेस्ट-५०१
च्ठाणे-कल्याण डाऊन फास्टसह हार्बरच्या मानखुर्द-कुर्ला दोन्ही मार्गांवर

Web Title: Mega Blocks on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.