Join us  

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 7:53 AM

पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉकपश्चिम रेल्वेवर 11 तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा-मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

आज सकाळी ९.५३ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल शीव ते मुलुंड स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. शीव-मुलुंड दरम्यान त्या सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंडनंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.आज सकाळी ११.३० ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीवरून पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत एकही लोकल धावणार नाही. मेगा ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

(VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात)

(परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी)

पश्चिम ११ तासांचा ब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर लोअर परळच्या कामामुळे २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल ११ तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. यामध्ये चर्चगेट ते वांद्रे धिम्या मार्गावर तसेच चर्चगेट ते दादर जलद मार्गावर लोकल चालविण्यात येणार नाहीत. जलद मार्गावरील सर्व लोकल दादरपर्यंत तर धिम्या मार्गावरील सर्व लोकल वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येतील.

 

टॅग्स :मध्य रेल्वेहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वे