Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:38 PM

रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे;

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; परंतु पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाईल. कल्याणवरून सुटणाऱ्या सर्व जलद गाड्या सकाळी १०.३७ ते ३.०६ दरम्यान दिवा ते परेल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. तसेच या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. तर परळ अप मार्गावर जलद गाड्या चालविण्यात येणार असून नियोजित वेळेपेक्षा त्या २० मिनिटे उशिराने धावतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ पर्यंत सुटणाºया डाउन जलद गाड्या नियोजित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबणार आहेत. तसेच नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुटणाºया धिम्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.तर हार्बर मार्गावर वडाळा आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पनवेल, बेलापूर, वाशीला सकाळी १०.०३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाºया डाऊन दिशेकडील गाड्या तसेच सकाळी ९.४४ ते दुपारी ३.४७ पनवेल, बेलापूर, वाशीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या काळात पनवेल ते मानखुर्द ते पनवेल दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वेच्या वतीने रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तसेच इतर डागडुजीच्या कामांकरिता रविवार, २६ मेदरम्यान मध्यरात्री ११.५५ ते ३.५५ या वेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेतला जाईल. या काळात सर्व गाड्या सांताक्रुझ तसेच चर्चगेट स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील.

टॅग्स :रेल्वे