Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 5:57 AM

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान धिम्या मार्गावर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील माटुुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी, २१ एप्रिलला सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉककाळात माटुंग्याहून कल्याण दिशेकडे सुटणारी लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल. या वेळी सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर लोकल थांबेल. तर, कल्याण दिशेकडे जाणारी लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाही.सकाळी १०.५४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ०६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकलला दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांची सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणारी जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवरही थांबेल.हार्बर मार्गावर विशेष लोकलहार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे स्थानकासाठी सकाळी ११.४० ते दुपारी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत तसेच चुनाभट्टी, वांद्रे स्थानकाहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी आणि वडाळा स्थानकातून वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकांसाठी सुटणाºया सर्व लोकल तसेच सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटीसाठी तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुुर्ला विशेष लोकल फलाट क्रमांक ८ वरून चालविण्यात येतील.जलद मार्गावर जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावर रूळ दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉककाळात दोन्ही दिशेकडील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे