Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 5:20 AM

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल.

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पायाभूत कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावरील लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येतील.मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया जलद मार्गावरील लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. या वेळी लोकल सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्थानकानंतर लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. याचप्रमाणे ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत कल्याण दिशेकडे जाणाºया लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील.>प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल-कुर्ला विशेष लोकलहार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी/वांद्रे दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. चुनाभट्टी/वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत रद्द केल्या जातील.सीएसएमटी/वडाळा रोडहून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल या दिशेकडे तसेच सीएसएमटीहून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ वाजेपर्यत वांद्रे/गोरेगाव दिशेकडे एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाºया तसेच गोरेगाव/वांद्रेहून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकल रद्द केल्या जातील.ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून पनवेल-कुर्ला विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक काळात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.>रात्रकालीनविशेष ब्लॉकहार्बर मार्गावरील माहिम स्थानकावर २१ जुलै रोजी (शनिवार-रविवार) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान धारावी रोड उड्डाणपुलाचे काम केले जाईल.पायाभूत कामामुळे २० जुलै रोजी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वांद्रे शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री ११.२२ वाजता सुटेल. तर, शेवटची अंधेरी ते सीएसएमटी लोकल अंधेरीहून रात्री ११.२९ वाजता सुटेल. ब्लॉक काळात रात्री ११.३८ वाजताची सीएसएमटी ते अंधेरी लोकल, रात्री १२.३६ वाजताची सीएसएमटी ते वांद्रे लोकल तसेच रात्री ११.५२ आणि रात्री १२.३६ वाजताची अंधेरी ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येईल.>बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान चर्चगेट दिशेकडील सर्व धिम्या लोकल विरार/वसई रोड ते बोरीवली/गोरेगावपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. विरार दिशेकडील सर्व धिम्या लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरारपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान भार्इंदर स्थानकावरून कोणतीही लोकल सुटणार नाही.>दादर-रत्नागिरी पॅसेंजरदिवा स्थानकापासूनरविवारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीची सेवा दिवा स्थानकावर समाप्त करण्यात येईल. तर, गाडी क्रमांक ५०१०३ दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकाहून चालविण्यात येईल. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांसाठी दादर स्थानकाहून दिवा विशेष लोकल चालविण्यात येईल. ही गाडी दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटेल. ठाणे स्थानकात ४.०६ वाजता आणि दिवा स्थानकात ४.१६ वाजता पोहोचेल.

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमध्य रेल्वेहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वे