Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 5:41 AM

पनवेल-मानखुर्ददरम्यान विशेष लोकल; लोअर परळ, माहिम स्थानकावर लोकलला ठरावीक अंतराने दोनदा थांबा

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते परळ दरम्यान धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते अंधेरी स्थानकादरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे, शिवाय वांद्रे स्थानकादरम्यान शनिवारी रात्रकालीन मेजर ब्लॉक घेण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३७ पासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सुटणारी सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरून धावतील. त्या दिवा ते परळदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.५ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाºया सर्व जलद लोकल नियोजित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा येथेही थांबतील.हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत तसेच सकाळी १०.३४ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक दरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर, ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा येथून चालविण्यात येईल. दादरच्या प्रवाशांसाठी दादर स्थानकाहून ३.४० वाजता दिवा विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. मध्य, हार्बरवर आज पॉवरब्लॉकमध्य रेल्वे मार्गावर २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांपर्यत पायाभूत कामासाठी दोन्ही दिशेकडील जलद धीम्या मार्गावर पॉवरब्लॉक घेण्यात आला आहे. यासह हार्बर रेल्वेच्या दोन्ही मार्गावर शनिवार २७ एप्रिल रोजी रात्री १ वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे.बोरीवली ते अंधेरी दरम्यान जम्बो ब्लॉकरेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणेतील सुधारणेसाठी रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत बोरीवली ते अंधेरी स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर पाच तास जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर सर्व लोकल सांताक्रुझ ते बोरीवली स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. या लोकलना फलाटाची लांबी कमी असल्याने विलेपार्ले स्थानकावर दोनदा थांबा असेल. लोकल राम मंदिर येथे थांबणार नाहीत. ब्लॉकदरम्यान बोरीवली स्थानकादरम्यान फलाट क्रमांक १,२,३ आणि ४ वर एकही लोकल चालविण्यात येणार नाही.आज मध्यरात्री मेजर ब्लॉकवांद्रे स्थानक येथे गर्डरचे पाडकामासाठी शनिवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजल्यापर्यंत विरार दिशेकडील मार्गावर मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासह सी लूप मार्गावर मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत चर्चगेट दिशेकडे आणि विरार दिशेकडील जलद मार्गावर तीन तासांचा मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान सर्व लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकलला थांबा देण्यात येणार नाही. लोअर परळ आणि माहिम स्थानकांवर १५ डब्यांच्या गाड्यांना दोनदा थांबा दिला जाणार आहे. धिम्या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल या दरम्यान चर्चगेट दिशेकडील जलद मार्गावर चालविण्यात येणार आहे. या लोकलला खार रोड स्थानकावर दोनदा थांबा दिला जाणार आहे. माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ व महालक्ष्मी स्थानकावर थांबा दिला जाणार नाही.

टॅग्स :पश्चिम रेल्वेहार्बर रेल्वेमध्य रेल्वे