Join us  

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर 'वर्षा'वर महत्त्वाची बैठक, शरद पवारही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 5:18 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची झाल्याचे बोलले जात आहे.या बैठकीत सीएए, एनआरसीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. विशेष म्हणजे, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची झाल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सीएए, एनआरसी यांच्याविरोधात आंदोलने भडकवणाऱ्यांनी आधी कायदा समजून घ्यावा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला सल्ला दिला. तासभर चाललेल्या बैठकीत महाराष्ट्राचे प्रश्न व महाविकास आघाडीमुळे बदललेल्या राजकारणावर त्यांच्यात चर्चा झाली. मतभेद दूर ठेवून महाराष्ट्राला मदत करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी दिल्ली भेटीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. सोनिया गांधींसोबतही उद्धव ठाकरे यांनी विविध विषयावर चर्चा केली होती.

दरम्यान, काल दिल्लीत नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीत सीएए, एनआरसीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचेही बोलले जात आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिवाय, अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, विरोधकांचा सामना कसा करावा, याबाबतची रणनीतीही या बैठकीत झाल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला; सीएएवर जाहीर बोलण्यापूर्वी नीट समजून घ्या, अन्यथा...

शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला घर चालवण्याचा वेगळा 'मंत्र'

'त्या' तरुणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; मी एकटी नाही, फक्त चेहरा आहे माझ्यामागे तर... 

संपूर्ण देशात एनआरसी लागू न करण्याचे मोदींनी आश्वासन दिले : उद्धव ठाकरे

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरे