क्लस्टरच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठक
By Admin | Updated: June 12, 2015 22:49 IST2015-06-12T22:49:06+5:302015-06-12T22:49:06+5:30
ठाण्याच्या क्लस्टर योजनेला तत्कालीन आघाडी सरकारने मंजुरी दिली असली तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. यामुळे या

क्लस्टरच्या अडचणी सोडविण्यासाठी बैठक
ठाणे : ठाण्याच्या क्लस्टर योजनेला तत्कालीन आघाडी सरकारने मंजुरी दिली असली तरी तिला अद्याप गती मिळालेली नाही. यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत्या मंगळवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत क्लस्टर योजनेपुढील अडचणींचा आढावा घेऊन त्या तातडीने दूर करण्याबाबत पावले उचलण्याबाबत तोडगा काढण्यात येणार आहे.
शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेऊन क्लस्टर डेव्हलपमेंट योजना रखडल्याने लाखो ठाणेकरांची कुचंबणा त्यांच्यासमोर मांडून तातडीने अडचणी दूर करण्याची मागणी केली. त्यानुसार, ही बैठक आयोजित केली आहे.
ठाण्यातील बेकायदा तसेच धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढून तेथील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर ही योजना रखडली.