Join us

वाहतूक संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 02:55 IST

Raj Thackeray News : राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई : राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंज निवासस्थानी झालेल्या या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आर्थिक समस्या मांडल्या. कोरोना संकटकाळात राज्यातील वाहतूक व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेक  वाहन चालकांनी बँका आणि  फायनान्स कंपनींकडून कर्ज घेतले  आहे. मात्र कोरोना काळात आर्थिक अवस्था बिकट असल्याने अनेकांना कर्जाचे हफ्त भरता येत नाहीत. त्यामुळे वारंवार बँकांकडून त्रास दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक व्यावसायिक संघटनांनी राज ठाकरेंची भेट घेतली.यावेळी राज ठाकरे यांनी आपण स्वतः सर्व बँक आणि फायनास कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे या सर्व बँका आणि फायनास कंपन्यांना पत्राची मुदत वाढवून देण्यास सांगणार आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक संघटनेचे नेते संजय नाईक यांनी दिली.

टॅग्स :राज ठाकरेमुंबई