शिर्डीतील कामे प्राधान्याने पूर्ण करा : मुख्यमंत्री

By Admin | Updated: July 7, 2017 04:23 IST2017-07-07T04:23:25+5:302017-07-07T04:23:25+5:30

साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शासनाने विविध कामांचा समावेश असलेला शिर्डी विकास आराखडा मंजूर केला आहे

Meet Shirdi's tasks with priority: CM | शिर्डीतील कामे प्राधान्याने पूर्ण करा : मुख्यमंत्री

शिर्डीतील कामे प्राधान्याने पूर्ण करा : मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / शिर्डी : साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शासनाने विविध कामांचा समावेश असलेला शिर्डी विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार मान्यता मिळालेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला.
विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मुंबईत बैठक झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदींसह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

Web Title: Meet Shirdi's tasks with priority: CM