पंतप्रधानांना भेटणो स्वपAवतच
By Admin | Updated: July 12, 2014 22:38 IST2014-07-12T22:38:18+5:302014-07-12T22:38:18+5:30
स्वपAातही न पाहिलेले प्रत्यक्षात साकारले असल्याची प्रतिक्रिया हृतिक पवार या विद्याथ्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांना भेटणो स्वपAवतच
नवी मुंबई : स्वपAातही न पाहिलेले प्रत्यक्षात साकारले असल्याची प्रतिक्रिया हृतिक पवार या विद्याथ्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर व्यक्त केली आहे. लोकमतच्या ग्रीन किड्स या स्पर्धेत विजेत्या विद्याथ्र्याना मोदींच्या भेटीची ही संधी प्राप्त झाली होती. त्यानुसार नेरूळच्या हृतिक पवार या विद्याथ्र्यानेही मोदी यांची भेट घेतली.
लोकमतने ‘निसर्ग सफारी’ या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या 35 विद्याथ्र्याची हवाई सफर घडवून आणली. यासाठी निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे. त्यामुळे लोकमतच्या निसर्ग सफारी स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्याथ्र्याना द्विगुणित आनंद मिळाला. नेरूळच्या हृतिक पवार (9 वी) या विद्याथ्र्याचाही या भाग्यवान विजेत्यांमध्ये समावेश होता. शिरवणो विद्यालयात शिकणारा हृतिक अभ्यासात हुशार असून प्रत्येक परीक्षेत तो उत्साहाने सहभाग घेत असतो. निसर्ग सफारी स्पर्धेतही त्याने सहभाग घेऊन नवी मुंबईतून विजेतेपद पटकावले होते. त्यानुसार त्यालाही या हवाई सफरीचा आनंद लुटता आला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने स्वपAातही या हवाई सफरीचा विचार केला नव्हता. परंतु लोकमतमुळे हे शक्य झाल्याचा आनंद त्याच्या चेह:यावर दिसून येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्याला खूप बरे वाटल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. प्रथमच संसद भवनात पाऊल ठेवले असल्याने तेथील आजुबाजूचा परिसर पाहत असतानाच अचानक आमच्या भेटीसाठी समोरुन चालत पंतप्रधान आले. प्रत्यक्ष आमच्यासमोर येवुन त्यांनी आम्हाला मराठीत, ‘कसे आहात मुलांनो?’ असे विचारले. आमच्यापैकी सांगलीच्या एका मुलाने पंतप्रधानांसाठी पत्र लिहून आणले होते. ते पत्र देखील त्यांनी वाचून काही वेळ चर्चा केली. त्यामुळे आपल्याला पंतप्रधान खूप आवडले असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. तर पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या मोहात पडून आपण तेथे नोकरीला लागावे अशी इच्छा आपल्या मनात निर्माण झाल्याचेही त्याने लोकमतशी बोलताना सांगितले. विद्याथ्र्याच्या भेटीनंतर मोदी यांनी लोकमतच्या ‘संस्कारांचे मोती’ या उपक्रमाची माहिती जाणून घेऊन लोकमतला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर विद्याथ्र्याना लोकमतच्या कर्मचा:यांनी यवतमाळ हाऊस, राजघाट, इंडिया गेट ही ठिकाणो दाखविली. हृतिक पंतप्रधानांना भेटून आल्यापासून आपल्याला नवी ओळख मिळाल्याची भावना त्याचे वडील शामराव पवार यांनी व्यक्त केली आहे. हे केवळ लोकमतच्या स्पर्धेमुळेच शक्य झाले असल्याचेही ते म्हणाले. आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला विमानात बसवणो कधीच शक्य झाले नसते, असेही त्यांनी सांगितले.