वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट

By Admin | Updated: February 6, 2015 00:58 IST2015-02-06T00:58:21+5:302015-02-06T00:58:21+5:30

काळाचौकी सामूहिक बलात्कार प्रकरणातील बळीत मुलीचे वैद्यकीय चाचणी अहवाल अटक आरोपींविरोधातला ठोस पुरावा ठरणार आहे.

The medical report has clearly explained the rape | वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट

वैद्यकीय अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट

मुंबई : काळाचौकी सामूहिक बलात्कार प्रकरणातील बळीत मुलीचे वैद्यकीय चाचणी अहवाल अटक आरोपींविरोधातला ठोस पुरावा ठरणार आहे. या अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मशीद बंदर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर म्हणून काम करणारे आरोपी सलीम शेख (२१), राहुल रफिक मंडल (२०) आणि पंंचू गणेश डोकी (२५) या तिघांनीही गुन्ह्यांंची कबुली दिली असून तिघेही पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
यामध्ये पीडित तरुणीच्या केलेल्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कॉटनग्रीन स्थानकालगत पार्क केलेल्या ट्रकमध्ये नेऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या दोन सुरक्षारक्षकांंच्या नजरेत ही बाब पडली. त्यांनी तत्काळ तरुणीला त्यापासून सोडविण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, घटनास्थळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनाही ही बाब समजताच त्यांनी आरोपींंच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये धाडसी कृत्य करणाऱ्या दोन्हीही सुरक्षारक्षकांंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई पोर्ट ट्रस्ट या परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक पार्किंग केली जाते. असे असताना एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने तेथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे. स्थानिकांंच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेअभावी येथे रात्री-अपरात्री फिरणेही धोकादायक असल्याचे समोर येत आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असतो. शिवाय मद्यपींबरोबरच गर्दुल्ल्यांंचा वावरही या परिसरात वाढत असल्याचेही स्थानिकांंचे म्हणणे आहे. या परिसरातील सुरक्षा वाढवावी याबाबत संबंधित प्रशासनाला कळविण्यात येणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

च्सोमवारी रात्री कामावरून घरी जाताना जेवणाबरोबर दारूचा बेत उरकून ही मंडळी रे रोड स्टेशनवर घरी जाण्यासाठी आले. दरम्यान, रे रोड स्थानकावर एकटी आणि घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या २१ वर्षीय तरुणीवर त्यांंची नजर पडली.
च्आणि सलीमने तरुणीला कॉटनग्रीन परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्लान आखला असल्याची माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
च्आणि ठरल्याप्रमाणे तरुणीचा विश्वास संपादन करून जेवण करण्याच्या बहाण्याने जेवणासाठी कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर उतरविले. तेथील रस्त्याकडेला पार्क केलेल्या एका ट्रकमध्ये धमकावून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Web Title: The medical report has clearly explained the rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.