मध्य रेल्वेने विकसित केला मेडी-बोट जिवाका; रुग्णांची काळजी अन् देखरेखीसाठी मदत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:26 AM2020-08-27T04:26:56+5:302020-08-27T04:27:14+5:30

व्हर्च्युअल हेल्थकेअरचे कार्य करणार

Medi-Boat Jivaka developed by Central Railway; It will help in the care and supervision of the patients | मध्य रेल्वेने विकसित केला मेडी-बोट जिवाका; रुग्णांची काळजी अन् देखरेखीसाठी मदत होणार

मध्य रेल्वेने विकसित केला मेडी-बोट जिवाका; रुग्णांची काळजी अन् देखरेखीसाठी मदत होणार

Next

मुंबई: कोरोनाविरोधात सुरुवातीपासूनच मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने पुढाकार घेतला आहे. कोरोना योद्ध्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन या कार्यशाळेने सध्याच्या कोरोना साथीच्या वापरासाठी वैद्यकीय रोबोट जीविका तयार केला आहे. यामुळे रुग्णांची काळजी अन् देखरेख करण्यासाठी मदत होणार आहे.  

जिवाकामध्ये रुग्णांचे द्विमार्ग संप्रेषण आणि व्हिडीओ कव्हरेज आहे. डॉक्टर रुग्णाशी बोलू शकतो आणि पडद्यावर रुग्ण पाहून व्हर्च्युअल तपासणी करू शकतो. जिवाकामध्ये इनबिल्ट डिव्हाइस आहे, जे रुग्णाच्या तपमान, रक्तदाब, हृदयगती आणि आॅक्सिजन पातळीचे परीक्षण करते. हे सर्व मापदंड त्यांच्या चेंबरमध्ये बसून डॉक्टरांद्वारे तपासले जाऊ शकतात. रुग्णाची व्हर्च्युअल तपासणी केल्यास डॉक्टर आणि पॅरामेडिक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात लक्षणीय घट होईल.  

जिवाकाकडे औषधाची पेटीही आहे, जी रुग्णाला नियमित औषधे देतात. एकदा पूर्ण तपासणी झाल्यावर आणि रुग्णाला औषध दिले गेले की, जिवाकाला पुन्हा निर्जंतुकीकरणासाठी त्याच्या डेकवर बोलावण्यात येईल आणि मग ते पुढच्या रुग्णासाठी आपोआप तयार होईल. या कार्यशाळेत यापूर्वी कोरोना योद्ध्यासाठी येथे मुखपट्ट्या, पीपीई कव्हरेल्स, सॅनिटायझर, आॅक्सिजन ट्रॉलीची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे डब्यांना कोरोना आयसोलेशन डब्यांमध्ये रूपांतरित केले आहे.

कोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी या रोबोटचे डिझाइन केले आहे आणि  रुग्णांशी आरोग्य सेवकांचा संपर्क कमी करेल. जिवाका रिमोट-कंट्रोल रोव्हर रुग्णांच्या बेडवर जाण्यासाठी चिन्हांकित ओळींचे अनुसरणही करू शकतो. हे रक्तदाब मोजणे, आॅक्सिजन संपृक्तता पातळी, शरीराचे तापमान इत्यादींसारख्या रुग्णांची काळजी आणि देखरेखीशी संबंधित विविध क्रिया करण्यासाठी व्हर्च्युअल हेल्थकेअरचे कार्य करते.

यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे 
जिवाका रोबोट तयार करण्यासाठी प्रधान मुख्य यांत्रिक इंजिनीअर ए.के.  गुप्ता, मुख्य कार्यशाळा इंजिनीअर बी.एम. अग्रवाल, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक विवेक आचार्य यांनी परळ कार्यशाळेच्या टीमला मार्गदर्शन केले आहे. ड्रोनस्टार्क आणि बीजीएन मेडटेक्स (इंडिया) प्रा.लि. यांच्या सहकार्याने परळ कार्यशाळा लिमिटेडने जिवाका या मेडी-बोटची संकल्पना आखली आणि डिझाइन केली आहे.

Web Title: Medi-Boat Jivaka developed by Central Railway; It will help in the care and supervision of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.