दरडींच्या देखरेखीसाठी यंत्रणा
By Admin | Updated: August 6, 2014 02:49 IST2014-08-06T02:49:45+5:302014-08-06T02:49:45+5:30
माळीण गावातील दुर्घटनेमुळे झोप उडालेल्या महापालिका आयुक्तांनी आपले अधिकार वापरत सर्व प्राधिकरणांची आज तातडीची बैठक घेतली़

दरडींच्या देखरेखीसाठी यंत्रणा
मुंबई : माळीण गावातील दुर्घटनेमुळे झोप उडालेल्या महापालिका आयुक्तांनी आपले अधिकार वापरत सर्व प्राधिकरणांची आज तातडीची बैठक घेतली़ त्यानुसार मुंबईतील 321 दरड परिसरांचे निरीक्षण करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे पाचारण जिओलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडियाला (जीएसआय) करण्यात आले आह़े मात्र या उपाययोजनांचा दरड परिसरातील रहिवाशांना यंदाच्या पावसाळ्यात दिलासा नाहीच़
बृहन्मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने आयुक्त सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलाविली होती़ या बैठकीत म्हाडा, गृहनिर्माण, जिल्हाधिकारी या प्राधिकरणांच्या अधिका:यांनी हजेरी लावली होती़ दरड परिसर सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आल़े त्यानुसार दरड परिसराच्या नियमित देखरेखीसाठी यंत्रणा उभारण्याची विनंती जीएसआयला करण्यात आली आह़े राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापणाने तयार केलेल्या नियमानुसार सव्रेक्षण होईल, असे आयुक्तांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
च्मुंबईतील 321 दरड परिसर धोकादायक स्थितीत आहेत़ आतार्पयत 12क्क् ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत़ मात्र अनेक ठिकाणी भिंतींना भेगा गेल्या आहेत़ त्यामुळे या भिंतींची दुरुस्ती अथवा नवीन भिंत बांधण्यासाठी निधीची आवश्यकता आह़े हा निधी पुरविण्यात येण्याची विनंती पालिकेमार्फत राज्य सरकारला केली जाणार आह़े
झोपुकडे संरक्षण भिंतीची जबाबदारी : म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत दरड परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात येत़े ही भिंत नऊ मीटर्पयत बांधण्यात येत़े मात्र या कामातही हद्दीचे वाद निर्माण होतात. त्यामुळे यापुढे भिंत बांधण्याची जबाबदारी झोपडपट्टी सुधार मंडळाकडे सोपविण्यात येईल.
पुनर्वसनाचा मुद्दा शासनाच्या कोर्टात
म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त सव्रेक्षणातून 17 ते 18 हजार झोपडपट्टय़ा दरड परिसरात असल्याचे निदर्शनास आले आह़े मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील झोपडपट्टय़ा बेकायदा अथवा त्यांचे पुनर्वसन करावे, याबाबत धोरण तयार करण्याची विनंती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आयुक्त करणार आहेत़
हे विभाग धोकादायक
मलबार हिल, शिवडी, घाटकोपर, चांदिवली, अणुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला, जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव
हे 1क् विभाग सर्वाधिक धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत़
तूर्तास कुचकामी उपाययोजना
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल़े तरी तूर्तास याचा फायदा दरड परिसरातील रहिवाशांना होणार नाही़ तूर्तास पालिका केवळ येथील रहिवाशांना पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देऊन बघ्याची भूमिका घेणार आह़े
रहिवाशांमध्ये जागृती
दरड परिसरातील रहिवाशांना नोटीस देऊनही कोणी स्थलांतरित होण्यास तयार नसत़े त्यामुळे पालिकेने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आह़े त्यानुसार एक माहितीपट तयार करून या दरड परिसरात दाखविण्यात येईल़ ज्यामध्ये दरड कोसळणार आहे का? याचा धोका आधीच कसा ओळखावा? याबाबत माहिती देण्यात येईल़ जेणोकरून तत्काळ तेथून हटून नागरिक आपला जीव वाचवू शकतील, असा विश्वास कुंटे यांनी व्यक्त केला़