Join us

विधिमंडळ समित्यांमध्ये शिवसेनेला झुकते माप; कामकाज सल्लागार समितीचे मुनगंटीवार अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:35 IST

legislative assembly : लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते.

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित १६ समित्यांपैकी सात समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेला, पाच समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांच्या अहवालांची तपासणी करणे हे महत्त्वाचे काम समिती करते.

 अध्यक्ष    समितीचे नाव    पक्षसुधीर मुनगंटीवार    लोकलेखा समिती    भाजपमनोहर चंद्रिकापुरे    रोजगार हमी समिती    राष्ट्रवादीसंजय रायमूलकर    पंचायत राज समिती    शिवसेनाअशोक पवार    सार्वजनिक उपक्रम समिती    राष्ट्रवादीकैलाश गोरंट्याल    आश्वासन समिती    काँग्रेसरणजित कांबळे    अंदाज समिती    काँग्रेसप्रणिती शिंदे    अनुसूचित जाती कल्याण समिती    काँग्रेसदौलत दरोडा    अनुसूचित जमाती कल्याण समिती    राष्ट्रवादीमंगेश कुडाळकर    इतर मागासवर्ग कल्याण समिती    शिवसेनाशांताराम मोरे    भटक्या विमुक्त जाती कल्याण समिती    शिवसेनाअमिन पटेल    अल्पसंख्यांक कल्याण समिती    काँग्रेसचेतन तुपे    मराठी भाषा समिती    राष्ट्रवादीदीपक केसरकर    हक्कभंग समिती    शिवसेनाआशिष जयस्वाल    उपविधान समिती    अपक्ष         (शिवसेना         सहयोगी)नरेंद्र भोंडेकर    अशासकीय ठराव समिती    अपक्ष         (शिवसेना         सहयोगी)राजन साळवी    आहार व्यवस्था समिती    शिवसेनासरोज अहिरे    महिला हक्क समिती    राष्ट्रवादी

टॅग्स :विधान भवनसुधीर मुनगंटीवार