मुलाखतीसाठी बोलावून एमबीएच्या तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:05 AM2019-09-24T04:05:59+5:302019-09-24T04:06:07+5:30

जुहू पोलिसांकडून आरोपीला अटक

An MBA girl raped by calling for interview | मुलाखतीसाठी बोलावून एमबीएच्या तरुणीवर बलात्कार

मुलाखतीसाठी बोलावून एमबीएच्या तरुणीवर बलात्कार

Next

मुंबई : बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एमबीएच्या २८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना विलेपार्लेमध्ये घडली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी साहिलसिंग अरोरा याला अटक केली आहे.

तक्रारदार तरुणी मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. एमबीए पूर्ण झाल्यानंतर तिने कामानिमित्त मुंबई गाठली. मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर पेर्इंगगेस्ट म्हणून ती मुंबईत राहात होती. खासगी नोकरीच्या पगारातून बचत होत नसल्याने तिची आर्थिक ओढाताण होत होती. त्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळावी यासाठी ती अनेकांच्या संपर्कात होती.

चांगल्या नोकरीसाठी तिने मित्र-मैत्रिणींकडे विचारणा करण्यासोबतच आॅनलाइन नोकरीचा शोधदेखील सुरू केला. नोकरी न मिळाल्यास तिने एप्रिल महिन्यातच गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचदरम्यान जुलैमध्ये ती आॅनलाइन नोकरीच्या शोधात असताना अरोराच्या संपर्कात आली. आरोपीने तिला अंधेरीतील एका नामांकित बँकेत एचआर म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यात महिना ३० हजार रुपये पगाराचे आश्वासन दिले. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.

तिला १९ तारखेला रात्री ११ च्या सुमारास मुलाखतीसाठी विलेपार्ले पश्चिमेकडील किंग्ज इंटरनॅशनल हॉटेलच्या रूम नं. ५११ मध्ये बोलावून घेतले. तिनेही चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या विश्वासाने तेथे जाण्याचे ठरविले. ती मुलाखतीसाठी हॉटेलवर जाताच, अरोराने मुलाखत घेण्याच्या नावाखाली तिच्याशी जवळीक साधली. तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करत घर गाठले. घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगून, जुहू पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करीत, अरोराला अटक केली आहे. अरोराने यापूर्वीही असा प्रकार केला आहे का? या दिशेने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: An MBA girl raped by calling for interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.