महापौरपदी स्नेहल आंबेरकर
By Admin | Updated: September 6, 2014 02:42 IST2014-09-06T02:42:50+5:302014-09-06T02:42:50+5:30
यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय होता़ मात्र महापौरपदाच्या शर्यतीत स्नेहल आंबेरकर ‘डार्क हॉर्स’ ठरल्या़

महापौरपदी स्नेहल आंबेरकर
मुंबई : आरक्षणामुळे अनुसूचित जातीच्या दोनच महिला नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला होता़ त्यातही कायद्याच्या पळवाटा काढून राजकीय वजन असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय होता़ मात्र महापौरपदाच्या शर्यतीत स्नेहल आंबेरकर ‘डार्क हॉर्स’ ठरल्या़
पालिका निवडणुकीत आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवक बाद झाल़े त्यामुळे ज्येष्ठ असलेले सुनील प्रभू, राहुल शेवाळे, यशोधर फणसे या त्रिकुटांकडे पालिकेचा कारभार सोपविण्यात आला़ मात्र राहुल शेवाळे खासदार होऊन दिल्लीत गेल्यानंतर प्रभू आणि फणसे यांनाही आमदारकीचे डोहाळे लागल़े त्यांच्यानंतर पालिकेत दुसरी फळी तयार करण्याची तसदी या मास्तरांनी घेतली नाही़ त्यामुळे शिवसेनेची पुरती कोंडी झाली आह़े त्यात महापौरपद यावर्षी अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या़
आरक्षणामुळे स्नेहल आंबेरकर आणि डॉ़ भारती बावदाणो या नवख्या नगरसेविकांचा पर्याय उरला़ विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महापौरपदासाठी डॅशिंग उमेदवाराची चाचपणी शिवसेनेतून सुरू झाली़ त्यानुसार खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या मात्र अनुसूचित जातीच्या असलेल्या यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय झाला़ मात्र जाधव यांनी यापूर्वी पालिकेतील सेना नेतृत्वाविरोधातच उघड बंड पुकारले होत़े त्यामुळे डॉक्टर असलेल्या भारती बावदाणो यांचे नाव चर्चेत आले होत़े मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंबेरकर यांना उमेदवारी जाहीर करीत या चर्चाना आज पूर्णविराम
दिला़ (प्रतिनिधी)
परळला दुस:यांदा महापौरपदाचा मान
वॉर्ड क्ऱ 194 परळमधून महादेव देवळे यांना महापौरपद मिळाले होत़े महापौरपदाच्या शर्यतीत तेदेखील त्या वेळीस डार्क हॉर्स ठरले होत़े त्यानंतर पुन्हा याच वॉर्डाकडे महापौरपद गेले आह़े आंबेरकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आह़े
उपमहापौरपदी
अलका केरकर
उपमहापौरपद भाजपाकडे असल्याने दरवर्षी या पदाला नवीन उमेदवार देण्याची प्रथा भाजपाने कायम ठेवली आह़े त्यानुसार अलका केरकर यांनी आज उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरला़ त्यांच्याविरोधात काँग्रेसचे चंदन शर्मा यांनी अर्ज भरला आह़े महापौर आणि उपमहापौर या पदांची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आह़े