शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात?

By Admin | Updated: June 6, 2015 02:15 IST2015-06-06T02:15:44+5:302015-06-06T02:15:44+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर येथील शिवाजी पार्क परिसरातच होणार असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.

Mayor of Shiv Sena's head in Bengal? | शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात?

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर येथील शिवाजी पार्क परिसरातच होणार असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. याकरिता दोन जागांची शिफारस सरकारने केली आहे. मात्र शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता महापौर बंगला हवा असून, तेथेच त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याची शिवसेनेची कल्पना आहे, असे शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
या वर्षी शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करीत असून, येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला स्मारकाच्या जागेची घोषणा शिवसेनेला अपेक्षित आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात विदेश दौऱ्यावरून परतल्यावर स्मारकाबाबत निर्णय होईल. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या स्मारकाकरिता शिवाजी पार्क परिसरातील महापौर निवासस्थानाशेजारील पार्क क्लबची आणि त्याच रस्त्यावरील दुसऱ्या टोकाला असलेली महापालिका क्रीडासंकुलाची जागा हे दोन पर्याय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवले आहेत. क्षत्रिय यांनी त्याच आधारे ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क परिसरात होईल, असे स्पष्ट केले. मात्र शिवसेनेच्या मनात वेगळेच आहे. गेली कित्येक वर्षे महापौरांचे निवासस्थान असलेला महापौर बंगला हाच शिवसेनेला ठाकरे यांच्या स्मारकाकरिता हवा आहे. महापौर बंगला हेरिटेज वास्तू असून ठाकरे यांनी अनेकदा या वास्तूला भेट दिलेली आहे. शिवसेनेच्या गेल्या ४९ वर्षांच्या इतिहासात अनेक घटनांचा हा बंगला साक्षीदार असल्याने तो ठाकरे यांच्या स्मारकाकरिता मिळावा, असा आग्रह आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे स्मारकाबाबत अहवाल प्राप्त झाला असून काही जागांची शिफारस केलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेशातून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Mayor of Shiv Sena's head in Bengal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.