Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लंडन बरो' शहराचे महापौर सुनील चोप्रा यांची विलेपार्ले क्रीडा संकुलास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:04 IST

लंडन बरो दक्षिण विभागाचे महापौर सुनील चोप्रा हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते.

मुंबई - मुंबईचे माजी महापौर-माजी आमदार दिवंगत डॉ. रमेश प्रभू यांनी विलेपार्ले (पूर्व) येथे क्रीडा संकुलाची १९९८ साली निर्मिती केली होती. या संकुलात १८ विविध क्रीडा प्रकारचे  तज्ज्ञ प्रशिक खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तरावर आपल्या खेळाच्या कौशल्याने क्रीडा संकुल व स्वत:ला गाजवत आहेत.

लंडन बरो दक्षिण विभागाचे महापौर सुनील चोप्रा हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संकुलात असणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलतरण तलाव, जिमनॅस्टिक विभाग, नेमबाज विभाग (शूटिंग रेंज),स्केटिंग विभाग,  व्यायाम शाळा(जिम)  तसेच इतर विभागास भेट देऊन  खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. 

यावेळी संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन  राणे,  विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडूरकर उपस्थित होते. नंतर त्यांनी खेळाडूसह  सर्व विश्वस्त्तांचे सुध्दा अभिनंदन केले. 

टॅग्स :मुंबईमहापौर