वसईत आज महापौर मॅरेथॉन

By Admin | Updated: November 22, 2015 00:23 IST2015-11-22T00:23:11+5:302015-11-22T00:23:11+5:30

तालुक्यातील एकंदरीत संघर्षमय वातावरण लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मॅरेथॉनबाबत सामोपचाराने तोडगा काढला. या प्रक्रियेत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकादेखील सहभागी झाल्या होत्या.

Mayor Marathon today in Vasaiet | वसईत आज महापौर मॅरेथॉन

वसईत आज महापौर मॅरेथॉन

वसई : तालुक्यातील एकंदरीत संघर्षमय वातावरण लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मॅरेथॉनबाबत सामोपचाराने तोडगा काढला. या प्रक्रियेत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकादेखील सहभागी झाल्या होत्या.
तालुक्याची देशभरात बदनामी होऊ नये, यासाठी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी विरोधकांना चर्चेला येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु, त्याला विरोधकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धेला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही कटुता टळावी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेला अपशकुन होता कामा नये, यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षिका यांनी पुढाकार घेत ही स्पर्धा केवळ शहरातूनच नेण्याची सूचना महापौर व आयुक्तांना केली. महापौर प्रवीणा ठाकूर यांनी संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व पोलिसांच्या सूचनेला प्रतिसाद दिला. त्यानंतर, स्पर्धेच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू झाली.
स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्याची डागडुजी, रस्त्यावर सफेद पट्टे मारणे तसेच स्पर्धकांना पाणी व वैद्यकीय सेवा देण्याकरिता बुथ उभारण्याच्या कामांना वेग आला. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धेच्या आयोजनाची तयारी पूर्ण होईल व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास महापौर प्रवीणा ठाकूर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

पाचव्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण
१. तिरंदाज (आर्चर) - दीपिका कुमारी व थाळीफेकपटू कृष्णा पोणिया स्पर्धेचे इव्हेंट अ‍ॅम्बेसेडर.
२. सिनेअभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची हजेरी.
३. स्पर्धेमध्ये ७ हजार ९०० स्पर्धक सहभागी.
४. यंदा बक्षिसाच्या रकमेत ५० हजारांनी वाढ होऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस २ लाख ५० हजारांचे करण्यात आले आहे.
५. या स्पर्धेसाठी पहाटे ३ वा. चर्चगेटहून विरारकरिता विशेष लोकल ट्रेन सोडण्यात येणार आहे.
६. स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
७. स्पर्धेच्या मार्गावर २१ ठिकाणी पाणी वितरण तसेच १३ ठिकाणी वैद्यकीय सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
८. या स्पर्धेसाठी एकूण २६ लाख रु.ची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Mayor Marathon today in Vasaiet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.