Join us  

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १ वाजता महापौर विमानतळावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:00 AM

मार्च २०१९ मध्ये मुंबईत प्रथम कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली होती.

मनोहर कुंभेजकर - 

मुंबई - कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूसंदर्भात पूर्वतयारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे  यांच्या निर्देशानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी चक्क आज मध्यरात्री १ वाजता अंधेरी (पूर्व) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीने तपासणी करण्यात येते, याची पाहणी करून काही निर्देश दिले.

मार्च २०१९ मध्ये मुंबईत प्रथम कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली होती.

कोरोना विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. ते पाहता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी,तसेच ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) काटेकोरपणे तपासावे, अशा विविध सूचना महापौरांनी यावेळी विमानतळ प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिकाविमानतळकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस