घरगुती वादाला वाळीत प्रकरणाची फोडणी
By Admin | Updated: January 16, 2015 22:47 IST2015-01-16T22:47:27+5:302015-01-16T22:47:27+5:30
पेणमध्ये वाळीत प्रकरणाचे वृत्त प्रसिध्द झाल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. मुळात घरगुती वादाला वाळीत प्रकरणाची फोडणी दिल्यामुळे नेमके प्रकरण झाले आहे

घरगुती वादाला वाळीत प्रकरणाची फोडणी
पेण : पेणमध्ये वाळीत प्रकरणाचे वृत्त प्रसिध्द झाल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. मुळात घरगुती वादाला वाळीत प्रकरणाची फोडणी दिल्यामुळे नेमके प्रकरण झाले आहे का याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शुक्रवारी पेण तहसीलदारांच्या दालनात शहरातील कोळी समाजबांधवांच्या अखत्यारीतील घरगुती वाद उघड झाला.
रायगड जिल्ह्यात वाळीत प्रकरणे उघडकीस येत असतानाच पेणमध्ये कोळीवाडा येथील विनय भोईर हे कोळी समाजाचे असून जागेच्या मालकी हक्कावरुन त्यांचा भावंडाशी वाद सुरु आहे. मुख्य म्हणजे विकास भोईर यांचे सातबारा उताऱ्यात नाव नसल्याने कायद्याने ते हक्क सांगू शकत नाही. समाजाने आपल्याला हेतूपुरस्सर डावलून वाळीत टाकल्याचा गैरसमज त्यांनी करुन घेतला होता आणि त्या संदर्भात शासकीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली. याबाबत वृत्त प्रसिध्द होताच प्रशासनाने प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले.
बैठकीत विनय भोईर यांना त्यांच्या पोटापाण्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा, म्हणून कोळी समाजाकडून त्यांना पेणच्या कौंढाळ तलाव येथील गाळा उपलब्ध करुन दिला होता. मात्र नगरपरिषदेने अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर भोईर यांना दिलेला गाळा पाडण्यात आला. त्यानंतर समाजाने त्यांना समाजाच्या वाल्मिकी मच्छीमार सोसायटीच्या इमारतीमध्ये उपलब्ध करुन दिला होता. मात्र तरीही वाळीत टाकल्याचा विनय भोईर यांच्या मनात सल कायम होता. तो या बैठकीत कायमचा पुसून टाकण्यात आल्याची घोषणा कोळी समाज अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी दूर केली. (वार्ताहर)