निष्ठावंतांना मान देण्याची संधी मातोश्री साधणार ?
By Admin | Updated: October 29, 2014 22:22 IST2014-10-29T22:22:44+5:302014-10-29T22:22:44+5:30
शिवसेनेत निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांनाच मान आहे. ते माङो कवच आहेत.

निष्ठावंतांना मान देण्याची संधी मातोश्री साधणार ?
ठाणो : शिवसेनेत निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांनाच मान आहे. ते माङो कवच आहेत. त्यांचा मान मी सदैव राखतो, असे सांगून अनंत तरे यांना कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून दाखल केलेली उमेदवारी माघारी घ्यायला व त्याबदल्यात त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन देणा:या उद्धव ठाकरेंना आता आपला शब्द खरा करण्याची संधी जनतेने दिली असून ते आता ती साधतात की नाही? याकडे तमाम शिवसेनेचे लक्ष लागले आहे.
तुम्ही उमेदवारी मागे घेतली तर तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी देऊ, असे आश्वासन उद्धवजींनी तरे यांना दिले, तेव्हा विधान परिषदेची निवडणूक तातडीने होण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. त्यामुळे तरे यांना दिलेला शब्द प्रत्यक्षात आणण्याची वेळ बरीच लांब आहे, अशी स्थिती होती. परंतु, झाले असे की, विधान परिषदेचे भाजपाचे तीन आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून आले आहेत. म्हणजे या चार जागांसाठी लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या चारही आमदारांना विधानसभेच्या आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. म्हणजे साधारणत: नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये विधान परिषदेच्या या जागांसाठी निवडणूक होईल. या चारही जागांसाठी विधानसभेच्या आमदारांचेच मतदान होणार आहे आणि ताज्या विधानसभेचे पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपाचे दोन, सेनेचा एक आणि काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा एक असे चार आमदार निवडून येतील. हे ध्यानी घेतले तर सेनेच्या संख्याबळातून जो आमदार विधान परिषदेवर निवडून दिला जाऊ शकतो, त्यासाठीची उमेदवारी अनंत तरे यांना दिली जाते की नाही, याकडे तमाम महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे लक्ष लागले आहे. निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकाला त्याचा मान राखण्याचे दिलेले वचन मातोश्री आणि उद्धवजी कसे पाळतात, हे सगळ्या शिवसेनेला दाखवून देण्याची उत्तम संधी त्यांना यानिमित्ताने प्राप्त झालेली आहे. ते ती साधतात की दवडतात? हा लाखमोलाचा प्रश्न ठरणार आहे. उप:यांना मातोश्रीने डोक्यावर घेतले तरी शिवसैनिक ते मान्य करीत नाहीत, हे ठाणो शहरमध्ये रवींद्र फाटकांच्या आणि ऐरोली मतदारसंघात विजय चौगुले यांच्या झालेल्या पराभवाने सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत सेनेमध्ये आजही निष्ठावंतांना मानाचे पान दिलेल्या शब्दानुसार खरोखरच दिले जाते, हे सिद्ध करणो अत्यावश्यक आहे. वसई-विरार महापालिका, ठाणो-पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका व त्यापाठोपाठ येणा:या हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुकांत सेनेला चांगली कामगिरी बजावायची असेल व शिवसैनिकांना खरोखर कामाला लावायचे असेल तर, त्यासाठी उद्धवजींनी तरेंना दिलेला शब्द पाळणो, हे अत्यावश्यक ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया सेनेतील अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांनी आणि पदाधिका:यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. हा प्रश्न आमदारकी कुणाला मिळते, हा नसून निष्ठावंतांचा मान आणि मातोश्रीने दिलेला शब्द राखला जातो की नाही? असा आहे. हे मातोश्रीने समजून घ्यावे, अशी मल्लीनाथीही शिवसेनेत अगदी प्रारंभापासून असलेल्या माजी पदाधिका:याने लोकमतशी बोलताना केली. (विशेष प्रतिनिधी)