माथेरानचे रस्ता रुंदीकरण रखडले

By Admin | Updated: March 4, 2015 22:23 IST2015-03-04T22:23:15+5:302015-03-04T22:23:15+5:30

जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. या रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या माथेरान दस्तुरीनाका रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीए करणार आहे.

Matheran's road widened | माथेरानचे रस्ता रुंदीकरण रखडले

माथेरानचे रस्ता रुंदीकरण रखडले

राहुल देशमुख- नेरळ
जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. या रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या माथेरान दस्तुरीनाका रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीए करणार आहे. मात्र गेली वर्षभर प्राधिकरण ठेकेदार निश्चित करू शकला नाही. आता पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे तूर्तास बाजारपेठेतील अतिक्रमणांना अभय मिळाले आहे.
नेरळमधील मुख्य रस्ता आणि स्टेशनवरून माथेरान रस्त्यावर असलेली अतिक्र मणे पर्यटक आणि वाहनचालक यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने २००८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे दूर केली होती. मात्र काही महिन्यातच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.
नेरळपासून दस्तुरीनाक्यापर्यंतचा रस्ता एमएमआरडीएकडून तयार करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने तो प्राधिकरणला हस्तांतरितही केला आहे. नेरळ- दस्तुरी रस्त्यावर उद्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंती आदींचा विचार करून एमएमआरडीएकडून रस्ता तयार करण्यात येणार आहे.
आठ किमीच्या या रस्त्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण तब्बल २७ कोटी रु पये खर्च करणार आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या, मात्र काही अंतर्गत वादामुळे अद्याप कामास सुरुवात होऊ शकलेली नाही. आता प्राधिकरण पुन्हा आॅनलाइन निविदा काढण्याची तयारीत आहे. प्राधिकरणाने आधी मंजूर केलेली निविदा ही जादा दराची होती. त्यास विरोध झाल्याने पुन्हा निविदा काढण्याचा घाट प्राधिकरणाने घातला आहे.

४नेरळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वहिवाटीचा रस्ता म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नेरळ - पेशवाई रोडचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता आता वाहनांसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

४नेरळच्या पूर्व भागातील लोकांना कर्जतकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून नेरळ - आंबिवली हा रस्ता ओळखला जातो. या रस्त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा आरमारमार्ग म्हणून हा रस्ता परिचित आहे. पेशवाई रस्ता म्हणून त्याची ओळख आहे.

४नेरळची गर्दी टाळण्यासाठी वाहने या रस्त्याचा वापर करायची, मात्र रायगड जिल्हा परिषद व बांधकाम विभागाने सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. १५ वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर न केल्याने पावसाळ्यात तर वाहने नेणे पूर्णपणे बंद असते.

४नेरळ - आंबिवली रेल्वे गेट अशा पेशवाई रस्त्यावर तर आता खड्डे एवढे प्रचंड वाढले आहेत की वाहने हा रस्ता टाळतात. हा ऐतिहासिक रस्ता टिकावा, म्हणून प्रशासन कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही.

१वावोशी : मुंबई-पुणे महामार्गावरील चौक जवळ गेल्या सहा महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. गेल्या आठवड्यात एकाच कुटुंबातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर उपाय म्हणून या परिसरातील महामार्गाची उंची वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२गेल्या महिन्यात वाहतूक शाखेतर्फे सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याच सप्ताहात चौकजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन माजी आमदार देवेंद्र साटम यांनी अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत मुंबई-पुणे महामार्गावरील चौकजवळ रस्त्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेवून मंत्रालयात झालेल्या या बैठकीत याला मंजुरी देण्यात आल्याचे माजी आमदार साटम यांनी सांगितले.

३चौक गावाजवळून गेलेल्या मुंबई-पुणे मार्ग हा चौक बसस्थानक दरम्यान महामार्ग एका बाजूने उंच व एका बाजूने खड्डा अशाप्रकारे आहे व बसस्थानक या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे असल्याने प्रवाशांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे अपघाताचीही शक्यता आहे. तसेच एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होवून एकाच कुटुंबातील चौघांना आपला जीव गमवावा लागल्याने मुंबई - पुणे मार्गाची चौक व रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याकडे एक मीटरने महामार्गाची उंची वाढवण्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असल्याचे देवेंद्र साटम यांनी सांगितले.

Web Title: Matheran's road widened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.