मातृदिनी ठाण्यात रंगला मॉं तुझे सलाम
By Admin | Updated: May 12, 2014 23:14 IST2014-05-12T20:56:39+5:302014-05-12T23:14:14+5:30
विशेष कामगिरी केलेल्या मातांचा सत्कार,विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्या मातांचा रविवारी माँ तुझे सलाम या कार्यक्रमाच्या माध्यमातून वुमन चिव्हर, स्पेशल चिव्हर अशा पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला.

मातृदिनी ठाण्यात रंगला मॉं तुझे सलाम
ठाणे - विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्या मातांचा रविवारी माँ तुझे सलाम या कार्यक्रमाच्या माध्यमातून वुमन चिव्हर, स्पेशल चिव्हर अशा पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान महोत्सव एन्टरटेनमेंट या संस्थेची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या हा कार्यक्रम डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजिला होता़ दिग्दर्शक महेश मांजरेकर, स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण यावेळी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ऑटेस्टिक मुलाचा सजगतेने सांभाळ करणारी माता मनिषा सिलम यांचा वुमन ॲचिव्हर पुरस्काराने तर चंदा इंदुलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे हिची आई स्मिता सुर्वे, सुदिप नगरकर याची आई मंजू नगरकर यांचा स्पेशल ॲचिव्हर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अमृता खानविलकर,पल्लवी भास्कर,अरूंधती भालेराव, साहित्यिक अनुराधा राजाध्यक्ष, नेहा निंबाळकर, वासंती गोकाणी, डॉ.मेधा मेहंदळे, डॉ.स्वाती डोंगरे, योगशिक्षिका सुषमा काळे, शिवाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रचना वेखंडे, तेजस्विनी चव्हाण,सुलेखा चव्हाण आदींचाही विशेष सत्कार करण्यात आला. उत्तरार्धात हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर झाला.(प्रतिनिधी)