रस्त्यांच्या कामात मैलाचे दगड गायब

By Admin | Updated: May 10, 2015 04:52 IST2015-05-10T04:52:52+5:302015-05-10T04:52:52+5:30

ब्रिटिश काळात मुंबईतील रस्त्यांवर अंतर दर्शवणारे मैलाचे दगड रस्तारुंदीकरण व विकासाच्या कामांमध्ये नामशेष होत चालले आहेत़ विशेष

Masonry disappeared in road work | रस्त्यांच्या कामात मैलाचे दगड गायब

रस्त्यांच्या कामात मैलाचे दगड गायब

मुंबई : ब्रिटिश काळात मुंबईतील रस्त्यांवर अंतर दर्शवणारे मैलाचे दगड रस्तारुंदीकरण व विकासाच्या कामांमध्ये नामशेष होत चालले आहेत़ विशेष म्हणजे पुरातन वास्तूंच्या यादीत श्रेणी १ हा दर्जा असतानाही रस्तेदुरुस्तीत मैलाच्या दगडांकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे अनेक ठिकाणी हे पुरातन दगड गायब झाले आहेत़
रस्ते चकाचक करण्यासाठी तीन वर्षांचा मास्टर प्लॅन महापालिकेने आखला आहे़ त्यानुसार रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे़ या प्रकल्पांतर्गत ५९८ रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे़ मात्र ठेकेदारांना याचे महत्त्व कळत नसल्याने अनेक ठिकाणी मैलाच्या दगडांचे तुकडे उडू लागले आहेत़ दुरुस्तीकाम नियोजनबद्ध नसल्याने काही ठिकाणी मैलाचे दगड गायब झाल्यामुळे पुरातन तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत़
दादर पूर्व येथील डॉ़ आंबेडकर मार्ग, दादर पश्चिम येथील अन्टोनियो डिसिल्वा शाळा, गवालिया टँक अशा काही मैलाच्या दगडांचा यामध्ये समावेश आहे़ ही बाब मनसेच्या रस्ते आणि पायाभूत कक्षाने आयुक्त अजय मेहता यांच्या निदर्शनास आणली आहे़ मात्र रस्तेदुरुस्तीत मैलाच्या दगडांची विशेष काळजी घेण्याची ताकीद ठेकेदारांना देण्यात आल्याचे स्पष्टीकरण रस्ते खात्याचे अधिकारी देत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Masonry disappeared in road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.