लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना घातला गंडा

By Admin | Updated: April 13, 2016 02:53 IST2016-04-13T02:53:39+5:302016-04-13T02:53:39+5:30

सोशल नेटवर्किंग साईटवरून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीला माटुंगा पोलिसांनी बेड्या घातल्या. आनंद सिंह असे या आरोपीचे नाव आहे.

Married to the young women by showing the lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना घातला गंडा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींना घातला गंडा

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईटवरून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या आरोपीला माटुंगा पोलिसांनी बेड्या घातल्या. आनंद सिंह असे या आरोपीचे नाव आहे.
लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावर या आरोपीने स्वत:चे बनावट प्रोफाईल तयार केले होते. सानपाडा येथे राहणाऱ्या एका मुलीशी या आरोपीने या संकेतस्थळावरून ओळख केली. या प्रोफाईलमध्ये आरोपीने पत्ता जर्मनीतील दिला होता. त्यानंतर त्याने तिला भेटण्याचा आग्रह धरला. कामानिमित्त मुंबईत येत असल्याचे सांगत तिला दादर परिसरात बोलावले. त्यानंतर या भामट्याने गोड बोलून तिच्याकडून १५ हजार रुपये घेतले. मात्र काही दिवसांनंतर त्याचे प्रोफाईलच गायब झाल्याने या तरुणीने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात चेंबूरमधील एका ज्वेलरी दुकानातील सीसीटीव्हीत त्याचा चेहरा कैद झाला. तरुणीने या आरोपीला ओळखताच पोलिसांनी तपास सुरू केला. माटुंगा परिसरात तो एका तरुणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Married to the young women by showing the lover of marriage