आठ वर्षांपासून मित्राकडून विवाहितेवर बलात्कार; फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:50 IST2018-07-06T02:50:48+5:302018-07-06T02:50:52+5:30

दोघेही चांगले मित्र. मैत्रिणीचे लग्न झाले. मात्र ती आपली होऊ शकली नाही म्हणून त्याने मैत्रिणीचे खासगी फोटो मिळविले. हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

Married raping friend for eight years; Threat to throw photos on social media | आठ वर्षांपासून मित्राकडून विवाहितेवर बलात्कार; फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

आठ वर्षांपासून मित्राकडून विवाहितेवर बलात्कार; फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी

मुंबई : दोघेही चांगले मित्र. मैत्रिणीचे लग्न झाले. मात्र ती आपली होऊ शकली नाही म्हणून त्याने मैत्रिणीचे खासगी फोटो मिळविले. हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याचाही व्हिडीओ तयार केला. पुढे तोच नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देत गेली ८ वर्षे तो तिच्यावर बलात्कार करत असल्याची धक्कादायक माहिती कुर्ल्यात समोर आली आहे. अखेर त्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या ३१ वर्षीय विवाहितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलिसांनी सुरज पाणीग्रहीविरुद्ध बलात्कार तसेच अनैसर्गिक शरीरसंबंध, तसेच धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विक्रोळी परिसरात रीना (नावात बदल) ही कुटुंबीयांसोबत राहते. सुरज हा तिचा मित्र. त्याचे रीनावर एकतर्फी प्रेम होते. रीनाचे दुसऱ्याच तरुणासोबत लग्न झाल्याने सुरजचा राग अनावर झाला. लग्नानंतर रीनाने त्याच्याशी संपर्क कमी केला. रीना आपल्यापासून दूर जातेय म्हणून त्याने तिचे खासगी फोटो मिळविले. २०११ मध्ये त्याने तिला कुर्ला स्थानकात बोलावले. तेथे तिला खासगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तिला हे ऐकताच धक्का बसला. त्या बदल्यात त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. फोटो सोशल मीडियावर गेल्यास लग्न मोडेल या भीतीने तिने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला. तिला माथेरान येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ काढला. पुढे हाच व्हिडीओ नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देऊन तो तिच्यावर गेली ८ वर्षे बलात्कार तसेच अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवत होता. त्याच्या मागण्या वाढत असल्याने रीनाने याबाबत कुटुंबीयांना सांगितले आणि त्यांच्या मदतीने विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. सुरज हा कुर्ला येथील वर्षानगर परिसरात राहण्यास आहे.

Web Title: Married raping friend for eight years; Threat to throw photos on social media