काम मिळवून देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: October 2, 2014 01:40 IST2014-10-02T01:40:08+5:302014-10-02T01:40:08+5:30
विवाहितेला निजर्न ठिकाणी नेत तिच्यावर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.

काम मिळवून देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर सामूहिक बलात्कार
मुंबई: मोठय़ा बांधकामाधील इमारतीच्या साइटवर काम मिळवून देण्याच्या बहाण्याने लोअर परळ परिसरात राहणा:या 22 वर्षीय विवाहितेला निजर्न ठिकाणी नेत तिच्यावर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून, चौथ्या आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना केली आहे.
याप्रकरणी आरोपी मोहंमद इसरुद्दीन (27), कमाल हसन (23) यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दोन्ही साथीदारांच्या अटकेची माहिती मिळताच पसार होण्याच्या तयारीत असलेल्या मोहंमद रखीऊल इस्लाम (2क्) याला आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी अटक करण्यात आली आहे. लोअर परळ परिसरात राहणारी 22 वर्षीय विवाहिता पतीसोबत याच परिसरातील बांधकामाधीन इमारतीमध्ये मजुरीचे काम होती. याच ठिकाणी काम करणा:या
तरुणाने पतीशी असलेल्या मैत्रीचा फायदा उठवून तिच्याशी ओळख वाढविली.
तिला कांदिवली परिसरातील एका मोठय़ा साइटवर काम मिळवून देतो, अशी बतावणी करून या तरुणाने 20 सप्टेंबर रोजी तिला आपल्यासोबत साकीनाका परिसरातील एका निजर्न ठिकाणी नेले. तेथे या तरुणाचे अन्य 3 साथीदार पहिल्यापासूनच दबा धरून बसले होते.
विवाहितेला घेऊन हा तरुण तेथे पोहोचताच चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. शिवाय वाच्यता न करण्याची धमकी देऊन चौघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी विवाहितेने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. भायखळा पोलिसांनी याप्रकरणी 4 तरुणांविरोधात सामूहिक बलात्काराचे गुन्हे दाखल करून गुन्हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला. (प्रतिनिधी)