मुलुंडमध्ये विवाहितेने जाळून घेतले

By Admin | Updated: May 13, 2014 23:45 IST2014-05-13T21:50:04+5:302014-05-13T23:45:50+5:30

घरगुती वादातून घरात कुणीही नसताना कविता रामदास शेवाळे (३२) या विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याची घटना मुलुंड येथे घडली.

Married married in Mulund | मुलुंडमध्ये विवाहितेने जाळून घेतले

मुलुंडमध्ये विवाहितेने जाळून घेतले

मुंबई: घरगुती वादातून घरात कुणीही नसताना कविता रामदास शेवाळे (३२) या विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याची घटना मुलुंड येथे घडली.
कविता पती, सासू — सासरे आणि दोन मुलांसोबत गोशाळा रोडवरील रामगड येथे राहात होती. मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घरात कुणीही नसताना तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. घरातून धूर येत असल्याने शेजार्‍यांनी घराकडे धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्यामुळे दरवाजा तोडून त्यांनी कविताला बहेर काढले आणि मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी कविताचा जबाब नोंदविला असता दररोजच्या घरगुती वादातून सासू सासर्‍यांकडून होत असलेल्या जाचाला कंटळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची जबानी दिली. कविता १०० टक्के भाजली असून तिला सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Married married in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.