विवाहितेचा छळ; नऊ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: February 12, 2015 22:33 IST2015-02-12T22:33:44+5:302015-02-12T22:33:44+5:30
पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासरे तसेच सासरच्या नऊ जणांवर गुन्हा

विवाहितेचा छळ; नऊ जणांवर गुन्हा
महाड : पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासरे तसेच सासरच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील नडगाव सापे या गावात ही घटना घडली. यासिन हानिफ देशमुख (२५) या विवाहितेने या छळवणुकीविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.
लाडवलीतील यासिनचे नडगाव येथील हानिफ देशमुख यांच्याशी २०१३ मध्ये लग्न झालेले होते. मात्र लग्नानंतर आठच दिवसात यासिनचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ सुरु केला. पाच लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी पतीसह, सासू, सासरे, दीर, नणंद यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या जाचाला कंटाळून यासिनने महाड न्यायालयात दाद मागितली. (वार्ताहर)