विवाहितेला कोंडून ठेवून बलात्कार
By Admin | Updated: January 1, 2015 01:52 IST2015-01-01T01:52:55+5:302015-01-01T01:52:55+5:30
जळणाची लाकडे आणण्यासाठी रानात गेलेल्या एका विवाहितेला (२५) जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना महाड तालुक्यातील निगडे येथे घडली.

विवाहितेला कोंडून ठेवून बलात्कार
महाड : जळणाची लाकडे आणण्यासाठी रानात गेलेल्या एका विवाहितेला (२५) जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना महाड तालुक्यातील निगडे येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी संदीप रामचंद्र माने (२८) फरार आहे.
निगडे मानेवाडी येथील ही महिला १६ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली होती. १६ डिसेंबर रोजी ही महिला मळणासाठी लाकडे आणणसाठी जात असताना त्याच गावातील संदीप माने हा तरुणाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता जबरदस्तीने आपल्या पिकअप जीप गाडीत तिला बसवले आणि भावे बौध्दवाडी येथील एका खोलीत डांबून ठेवले होते. यावेळी तिने विरोध केला असता तिच्या अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचा दोन दिवस लैगिक छळ केला. १८ डिसेंबर रोजी त्याने तिच्यावर बलात्कार करुन तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने व मोबाइल असा ८२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. तसेच याबाबत कुठे वाचता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.
तिसऱ्या दिवशी तिची सुटका झाल्यानंतर या पीडित महिलेने घडल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात या महिलेने फिर्याद दाखल केली. या प्रकरणी आरोपी संदीप माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकारी एन.डी. सस्ते तपास करत आहेत. (वार्ताहर)