‘व्हॅलेंटाइन डे’साठी बाजारपेठा सजल्या

By Admin | Updated: February 8, 2015 22:46 IST2015-02-08T22:46:47+5:302015-02-08T22:46:47+5:30

व्हॅलेंटाइन डे ला आवडत्या व्यक्तीला ग्रीटिंग देऊन आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे

Markets for 'Valentine's Day' have been decorated | ‘व्हॅलेंटाइन डे’साठी बाजारपेठा सजल्या

‘व्हॅलेंटाइन डे’साठी बाजारपेठा सजल्या

जान्हवी मोर्ये, ठाणे
व्हॅलेंटाइन डे ला आवडत्या व्यक्तीला ग्रीटिंग देऊन आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचविण्याची पद्धत आता खूप जुनी झाली आहे. स्मार्ट फोनमुळे प्रेमवीरांसमोरअनेक पर्याय आले आहेत. अ‍ॅपमुळे विविध प्रकारचे ग्रीटिंग्ज किंवा मेसेज प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविता येतात. शिवाय, व्हॉट्सअ‍ॅप आहेच. असे असले तरी व्हॅलेंटाइन डे ला गिफ्ट देण्याची पद्धत आजही कायम आहे. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच वेगवेगळ्या गिफ्ट्सनी बाजारपेठा सजल्या आहेत. यंगस्टार्सकडून खरेदीला सुरुवातही झाली आहे. यंदा व्हॅलेंटाइन डे च्या गिफ्टमध्ये सर्वाधिक पसंती टेडीला दिली जात आहे.
व्हॅलेंटाइन डे साठी बाजारात विविध प्रकारचे म्युझिकल डोम, मेसेज बॉटल, शो पीस विथ मेसेज बॉटल, रेड कलर मेणबत्ती, म्युझिकल टेडी, लव्ह साँग म्हणणारे टेडी, म्युझिकल मग, प्रेमाचा संदेश देणारा टेडी, विविध प्रकारची ज्वेलरी, ग्रीटिंग कार्डमधील विविध प्रकार आहेत. म्युझिकल डोममध्ये फोटो लावता येऊ शकतो. मेसेज बॉटलमध्ये मेसेज टाकून गिफ्ट करता येऊ शकते. सध्या बाजारात फोटो लावता येऊ शकतील असे किंवा म्युझिकल ग्रीटिंग कार्ड्सही आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील ग्रीटिंग आहेत. हार्ट शेपमधील छोटी-छोटी पुस्तकेही बाजारात आली असून त्यात लव्ह मेसेज देण्यात आले आहेत. यंदा बाजारात म्युझिकल मग आणि ग्रीटिंग्जमध्ये अ‍ॅटॅच फोटो हा ट्रेण्ड नवीन आहे. अजूनही न्यू अ‍ॅट्रॅक्शन्स् येण्याची शक्यता आहे.

Web Title: Markets for 'Valentine's Day' have been decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.