घटस्थापनेच्या साहित्याने बाजार फुलला

By Admin | Updated: September 18, 2014 01:13 IST2014-09-18T01:13:19+5:302014-09-18T01:13:19+5:30

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. घराघरात घट आणि गरब्याची विधिवत स्थापना करून देवीची नऊ दिवस भक्तीभावाने पूजा केली जाते.

Marketplaces with Inflation Material | घटस्थापनेच्या साहित्याने बाजार फुलला

घटस्थापनेच्या साहित्याने बाजार फुलला

पूनम गुरव - नवी मुंबई
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे.  घराघरात घट आणि गरब्याची विधिवत स्थापना करून देवीची नऊ दिवस भक्तीभावाने पूजा केली जाते.  या पाश्र्वभूमीवर वाशीच्या घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत घट आणि गरबा खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. 
नवरात्र उत्सवात सर्वानाच भक्ती, शक्ती, संयम यांचा संगम अनुभवयास मिळतो. नवरात्र उत्सवाला कमी कालावधी राहिल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. देवीच्या स्थापनेबरोबर सार्वजनिक मंडळ आणि घराघरात घटस्थापना केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत वेगवेगळय़ा रंगांत आणि आकारामध्ये गरबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर घटस्थापनेसाठी लागणा:या विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची एकच गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. 
सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये मोठय़ा भक्तिभावाने घटाची स्थापना करतात. त्यामुळे बाजारपेठेत लहान आकारापासून मोठय़ा आकारातील गरबे उपलब्ध आहेत. काळ्या रंगाचे साधे घटही बाजारात मिळत आहेत. तर रंगबेरंगी आरसे, मोती, मनी, जरीचे वर्क चकमकीत केलेले गरबे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. या गरब्यांना अधिक मागणी आहे. अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीच्या ऐवजी घटाची स्थापना करतात. गुजराती नागरिक गरब्याची स्थापना करतात. तर मराठी बांधव घटस्थापना करतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून सजवलेले गरबे मराठी ग्राहकांना आकर्षित करीत असल्याने गरब्यांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.
 पहिल्या दिवशी देवीची आणि घटाची  स्थापना करून या उत्सवाला सुरुवात होते. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसार्पयत देवीच्या वेगवेगळय़ा रूपांची पूजा केली जाते. त्याचप्रकारे घटस्थापना करून जागर सुरू होतो. त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. सजावटीसाठी कृत्रिम फुलांच्या माळा, कळस, आकर्षक तोरणो बाजारात उपलब्ध झाली आहेत. घटासाठी मातीच्या नक्षीदार मटक्याचा वापर केला जातो. साध्या घटाची किंमत 1क्क् ते 2क्क् रुपये आहे, तर वर्क करून आकर्षित तयार केलेल्या गरब्याची किंमत 2क्क् रुपये ते 2 हजार रुपयांपर्यत आहे. घटस्थापनेसाठी वापरण्यात येणा:या मातीच्या मडक्यात विविध नऊ प्रकारची कडधान्ये टाकली जातात. अशा कडधान्यांची पाकिटे सुध्दा बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत.
 
च्घटासाठी मातीच्या नक्षीदार सध्या मटक्याचा वापर केला जातो. साध्या घटाची किंमत 1क्क् ते 2क्क् रूपये आहे. तर वर्क करून आकर्षित तयार केलेल्या गरब्याची किंमत 2क्क् रूपये ते 2 हजार रूपयांपर्यत आहे.
 
च्अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीच्या ऐवजी घटाची स्थापना करतात.
च्गुजराती नागरिक गरब्याची स्थापना करतात, तर मराठी बांधव घटस्थापना करतात.

 

Web Title: Marketplaces with Inflation Material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.