उल्हासनगरात मार्केटच्या समस्या ‘जैसे थे’

By Admin | Updated: September 14, 2014 23:39 IST2014-09-14T23:39:36+5:302014-09-14T23:39:36+5:30

शहरातील गजानन मार्केट, जपानी मार्केट, इलेक्ट्ॅनिक मार्केट, फर्निचर मार्केटसह जिन्स मार्केट जिल्हात नव्हेंतर राज्यात-देशात प्रसिध्द असून मार्केटच्या समस्या गेल्या ५० वर्षा पासून जैसे थै

Market Problems in Ulhasnagar 'like' | उल्हासनगरात मार्केटच्या समस्या ‘जैसे थे’

उल्हासनगरात मार्केटच्या समस्या ‘जैसे थे’

सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरातील गजानन मार्केट, जपानी मार्केट, इलेक्ट्ॅनिक मार्केट, फर्निचर मार्केटसह जिन्स मार्केट जिल्हात नव्हेंतर राज्यात-देशात प्रसिध्द असून मार्केटच्या समस्या गेल्या ५० वर्षा पासून जैसे थै आहेत. निवडणुकीच्या वेळी व्यापा-यांवर विविध आश्वासनाचा वर्षाव करणारे राज्यकर्ते व आमदार त्यानंतर ढुंकूनही बघत नसल्याचा आरोप व्यापा-यांनी केला आहे.
उल्हासनगरातील घराघरात लहान-मोठा उद्योग चालत असल्याने, शहरात एमआयडीसी नसतांनाही उद्योगनगरीचा दर्जा मिळाला आहे. शहरातील मार्केटमध्ये राज्यातून नव्हें तर देशातून नागरीक व व्यापारी खरेदी करण्यासाठी येत आहेत. मात्र मार्केटची अवस्था गेल्या ५० वर्षा पासून जैसे थै असल्याने मार्केटला उतरती कळा लागून विविध समस्याने ग्रासले आहे. मार्केट परिसरात कुठेही वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिकांना व व्यापा-ंयाना रस्त्याच्या कडेला देवभरोसे गाडया पार्किंग कराव्या लागत आहे.
गजानन मार्केट व जपानी मार्केट कपडया साठी प्रसिध्द असून फर्निचरसाठी फर्निचर मार्केट तर ईलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंसाठी ईलेक्ट्रॉनिक मार्केट प्रसिध्द आहे. गाऊन साठी गाऊन मार्केट तर शाळेच्या दप्तरासाठी पवई चौकातील बॅग मार्केट राज्यात प्रसिध्द आहेत. तसेच देशातील २ क्रमांकाचे जीन्स मार्केट शहरात असून देशभरात शहरातील जीन्स पॅन्टला मोठी मागणी आहे. मार्केटमुळे पालिकेला व राज्य शासनाला कोटयावधीचे उत्पन्न मिळत असतांना मार्केट मात्र विविध समस्याने ग्रासले असल्याची ओरड व्यापारी करीत आहेत.
लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकी दरम्यांन विविध पक्षाचे नेते व्यापारी बांधवाशी हितगुज करून समस्या सोडविण्याचे आश्वासन वर्षानुवर्ष देत आहेत. मात्र वाहतूक कोंडी, शौचालय व पार्किंग सारख्या मूलभूत समस्याही गेल्या ५० वर्षा पासून सोडवू शकल्या नाहीत. शहरात सोनार गल्ली सोन्याच्या दागिन्यांसाठी राज्यात प्रसिध्द असून सोनार गल्लीत कोणतीही सुरक्षा नाही.
शहराला उद्योग नगरीचा दर्जा देणाऱ्या लहान-लहान कारखान्यांच्या व व्याापा-ंयाच्या मुलभूत समस्या स्थानिक आमदार, खासदार सोडवू शकले नसल्याने, शहरातील उद्योगाला घरघर लागल्याची खंत व्यापारी यांनी व्यक्त केली आहे. पार्किेग व्यवस्थेसह, वाहतूक कोंडी, रस्त्याची अवस्था, खरेदी साठी आलेल्या नागरीकांना शौचालयाची सुविधा, पाणी, आदी सुख-सुविधा देण्याची मागणी व्यापारी करीत असून या मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन जो उमेदवार देईल, त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची प्रतिक्रीया व्यापारी बांधव देत आहेत. व्यापा-ंयाच्या या भूमिकेमुळे संभाव्य उमेदवाराची जबाबदारी वाढली असून स्थानिक आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Market Problems in Ulhasnagar 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.