सागरी क्षेत्रांनाही तडाखा

By Admin | Updated: April 15, 2015 00:26 IST2015-04-15T00:26:49+5:302015-04-15T00:26:49+5:30

विकास नियंत्रण आराखड्यात मढ आयलँड, एरंगल, आक्सा, मार्वे या सागरीकिनाऱ्यावरील गावांनाही निवासी व वाणिज्य विकासासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

Marine territories also hit | सागरी क्षेत्रांनाही तडाखा

सागरी क्षेत्रांनाही तडाखा

शेफाली परब-पंडित ल्ल मुंबई
प्रतिबंधित सागरी नियंत्रण क्षेत्रही (सीआरझेड) विकासाच्या तावडीतून सुटलेले नाही. विकास नियंत्रण आराखड्यात मढ आयलँड, एरंगल, आक्सा, मार्वे या सागरीकिनाऱ्यावरील गावांनाही निवासी व वाणिज्य विकासासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत कठोर निर्बंधामुळे सुरक्षित असलेला सीआरझेड परिसरही धोक्यात येण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
आरे कॉलनी हे ना-विकास क्षेत्र विकासकांना आंदण देण्याचा घाट आराखड्यातून घालण्यात आला आहे. यावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली असताना सागरी नियंत्रण क्षेत्रात गणले जाणारे मढ आयलँड, एरंगल, आक्सा आणि मार्वेदेखील २०३४च्या आराखड्यात निवासी व वाणिज्य विकासासाठी आरक्षित करण्यात आले असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या २०११मधील अधिसूचनेनुसार मुंबईतील सर्व कोळीवाडे आणि त्यातील मोकळ्या जागांना श्रेणी ३चा दर्जा देत ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मात्र प्रस्तावित आराखड्यातून या सीआरझेड क्षेत्रांना विकासासाठी खुले करण्यात आले आहे. हे एक प्रकारे या अधिसूचनेचे उल्लंघन असल्याचे वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पेमेन्टा यांनी निदर्शनास आणले आहे.

च्महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमानुसार सीआरझेड क्षेत्रात विकास होत असतो. या नियमानुसार मढ आयलँड, एरंगल, आक्सा, मार्वे या चौपाट्यांवर मोठ्या भरतीपासून २०० मीटरपर्यंतचा परिसर हा ना-विकास क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतरही २०० ते ५०० मीटरपर्यंत हॉटेल, चौपाटीवरील रिसॉर्ट आणि मासेमारीला परवानगी देण्यात येते.

च्सीआरझेड अधिसूचना श्रेणी ३ नुसार ना-विकास क्षेत्रात पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या बांधकामांनाच दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीची (निश्चित धोरणानुसार) परवानगी आहे. मात्र कोणतेही नवीन बांधकाम या क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित आहे.
च्सागरीकिनारपट्टीवर वास्तव्य करणारे पारंपरिक समाज उदा. मच्छीमार, कोळी समाजाच्या बांधकामांची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करताना मोठ्या भरतीच्या क्षेत्रापासून १०० ते २०० मीटरपर्यंत मर्यादित आहे.

Web Title: Marine territories also hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.