मुंबई : क्विन्स नेकलेस अर्थात मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्याचे अधिक सक्षमपणे रक्षण करण्यासाठी येथील टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आतापर्यंत या समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक म्हणून ‘एम २०’ प्रतीचे काँक्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात येत होते. मात्र, समुद्राच्या लाटांचा वाढलेला जोर, वादळी वाऱ्यांची शक्यता आणि किनाऱ्याची धूप लक्षात घेता ‘एम ४०’ प्रतीचे टेट्रापॉड टाकण्यात येणार आहेत.
मुंबईच्या किनारपट्टीवर १९६० मध्ये पहिल्यांदा टेट्रापॉड्स बसवण्यात आले होते. त्यानंतर १९८२ आणि २००२ दरम्यान बसविलेल्या टेट्रापॉड्सचे आयुर्मान संपुष्टात आले आहे.
जुन्या टेट्रापॉडची झीज झाल्यामुळे बदलआधीचे टेट्रापॉड्स ‘एम २०’ गुणवत्ता असलेल्या सिमेंटपासून बनवण्यात आले होते. मात्र, जोराच्या लाटा, चक्रीवादळ आणि पावसामुळे यातील कित्येक टेट्रापॉड्सची झीज झाली आहे.त्यामुळे महापालिकेने येथे ‘एम ४०’ प्रतीचे टेट्रापॉड्स बसवण्याचा निर्णय घेतला असून येत्या पावसाळ्यापर्यंत हे काम केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुमारे शंभर वर्षांचे आयुर्मान- कोस्टल रोडच्या बांधकामादरम्यान तीन किलोमीटर अंतरावरील टेट्रापॉड्सचा काही भाग काढण्यात आला होता.- त्यामुळे मरिन ड्राइव्ह येथील प्रॉमिनेडचा काही भाग लाटांच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे नुकसान झाले. यावेळी ‘एम ४०’ गुणवत्ता असलेल्या सिमेंटचे टेट्रापॉड्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- या टेट्रापॉड्सचे आयुर्मान किमान १०० वर्षे असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यासाठी एकूण ४३ कोटी ६१ लाख रुपये खर्च येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.