मारिया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला; याचिका मागे

By Admin | Updated: December 21, 2014 02:02 IST2014-12-21T02:02:43+5:302014-12-21T02:02:43+5:30

राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी केलेल्या नियुक्तीत बेकायदा नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असून, यामुळे ही याचिकाही मागे घेण्यात आली़

Maria's appointment ended; Behind the petition | मारिया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला; याचिका मागे

मारिया यांच्या नियुक्तीचा वाद मिटला; याचिका मागे

मुंबई : राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी केलेल्या नियुक्तीत बेकायदा नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असून, यामुळे ही याचिकाही मागे घेण्यात आली़
एका सामाजिक कार्यकत्याने ही याचिका केली होती़ मारिया यांच्यापेक्षा इतर वरिष्ठ अधिकारी या पदाच्या शर्यतीत होते़ मात्र नियम डावलून मारिया यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली़ तेव्हा ही नियुक्ती रद्दबातल ठरवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती़ न्या़ अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात मारिया यांची नियुक्ती नियमानुसारच केल्याचा दावा सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला़ ही नियुक्ती करताना कोणालाही डावलण्यात आले नाही व कायद्याचे उल्लंघन झाले नाही़ मुळात हा जनहितार्थ विषय नसून ही याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने करणे योग्य नाही़ तेव्हा ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी अ‍ॅड़ वग्यानी यांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Maria's appointment ended; Behind the petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.