Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडक्या बहिणीं’ना ३१ मार्चची डेडलाईन; ई-केवायसीमधील दुरुस्तीसाठी अंतिम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:51 IST

सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर नोंदणी, पडताळणीत अनेक अर्ज बाद झाले. निकष न पूर्ण करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे एकूण लाभार्थी कमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे अनेक लाभार्थीचे हप्ते थांबले होते. त्यांना राज्य सरकारने दिलासा देत दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांची संख्या वाढत असल्याने लाभार्थी यादीत मोठी घटही दिसून येत आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने दि,२८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये थेट जमा होतात.

मुंबईत कुणाला दिलासा?

मुंबईत हजारो महिलांना ई-केवायसी दुरुस्तीची संधी असून बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

अधिकृत पोर्टल-अॅपवर लॉगिन करून तपासता येते, 'स्टेटस' सेक्शनमध्ये कारण स्पष्ट दिसते. तसेच जवळच्या केंद्रातही माहिती मिळू शकते.

ई-केवायसी करताना अशी काळजी घ्यावी?

सर्व माहिती अचूक भरणे, आधार व बँक तपशील पडताळून टाकणे, योग्य पर्याय निवडणे (उत्पन्न, वैवाहिक स्थिती), सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म तपासणे.

लाभार्थी संख्येत घट

सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर नोंदणी, पडताळणीत अनेक अर्ज बाद झाले. निकष न पूर्ण करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे एकूण लाभार्थी कमी झाले.

ई-केवायसीमधील छोट्या चुका मोठा परिणाम करतात. लाभार्थीनी ३१ मार्चपूर्वी माहिती अचूक भरून दुरुस्ती करावी, अन्यथा लाभ पुन्हा मिळवणे कठीण होऊ शकते. मुंबईत लाखो महिलांनी नोंदणी केली आहे. - महिला व बालविकास अधिकारी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Scheme: March 31 Deadline for E-KYC Correction

Web Summary : Ladki Bahin scheme beneficiaries get a final chance until March 31 to correct e-KYC errors. Many installments were stopped due to incorrect information. Mumbai women have a chance to restart payments.
टॅग्स :लाडकी बहीण योजनाराज्य सरकार