Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:08 IST

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यादरम्यान मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. तो होतो की नाही, याचा पंधरवड्यात सर्व कार्यालय प्रमुखांनी आढावा घेण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आले.