‘कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर करावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:49 AM2019-07-15T01:49:17+5:302019-07-15T01:49:20+5:30

मराठी भाषेतून तिकिट आरक्षण अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या कोकण विकास समन्वय समितीकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे मांडण्यात आल्या आहेत.

Marathi language should be used in Konkan Railway | ‘कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर करावा’

‘कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर करावा’

Next

मुंबई : कोकण रेल्वेत मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्यात यावा, ८० टक्के मराठी कामगार कोकण रेल्वेत असावे, मराठी भाषेतून तिकिट आरक्षण अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या कोकण विकास समन्वय समितीकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे मांडण्यात आल्या आहेत.
कोकण विकास समन्वय समिती आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांची नुकताच बैठक झाली. यावेळी मराठी भाषेचा आणि रोजगारात स्थानिक नागरिकांचा विचार करावा, असा सूर या बैठकीत धरला.
सर्व सुपरफास्ट गाड्यांना राजापूर, वैभववाडीला थांबा देण्यात यावा, वांद्रे ते सावंतवाडी दैनंदिन गाडी सुरू करण्यात यावी, नायगाव ते जुचंद्र चारपदरी प्रकल्प मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
कोकण रेल्वेतील कंत्राट स्थानिकांना देण्यात येतात. यासह स्टॉलवर ही मराठी कामगार घेण्यास उत्सुक आहोत. मात्र मराठी कामगार काम करण्यास तयार नाहीत़
>डबलडेकर मेल, एक्स्प्रेस रात्री चालविण्यात येणार ?
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या दरम्यान चालविण्यात येणारी डबलडेकर मेल, एक्स्प्रेस रात्री चालविण्यात यावी, अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली. या मागणी बाबत कोकण रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे. त्यामुळे प्रवाशांना लवकरच डबलडेकरची सुविधा रात्री मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Marathi language should be used in Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.